Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf ·...

18
WILLINGDON COLLEGE SANGLI Geography (B.A.-I) Introduction to Geomorphology Moodle 1

Transcript of Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf ·...

Page 1: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

WILLINGDON COLLEGE SANGLI

Geography (B.A.-I)

Introduction to Geomorphology

Moodle

1

Page 2: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

G E O G R A P H Y

Introduction to Geomorphology

Moodle developed By

Dr. R. G. Jadhav Department of Geography Willingdon College Sangli

Page 3: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

भू रू प शा स्त्र

1

अनुक्रमणिका

भूरूपशास्त्राची ओळख..................................................................................................... 2

1. भूरुपशास्त्राच्या व्याख्या .................................................................. 2

2. भूरुपशास्त्राच ेस्त्वरुप ....................................................................... 4

A. विणनात्मक स्त्वरूप .................................................................................................................... 4

B. ववतरिात्मक स्त्वरूप ................................................................................................................. 5

C. वैज्ञाननक स्त्वरूप ....................................................................................................................... 5

D. शास्त्रीय पाया असिारी शाखा ..................................................................................................... 5

E. भूरुपशास्त्र एक स्त्वतंर ज्ञानशाखेच ेस्त्वरूप ..................................................................................... 6

F. वैश्ववक व व्यापक स्त्वरूप ............................................................................................................ 6

G. अनुभवजन्य व सांश्ख्यकी स्त्वरूप ................................................................................................ 7

H. पद्धतशीर स्त्वरूप ....................................................................................................................... 7

I. आंतरववद्याशाखीय स्त्वरुप ........................................................................................................... 7

3. भूरुपशास्त्राची व्याप्ती ..................................................................... 8

A. सागर ककनारय्ाच ेभूरुपशास्त्र ...................................................................................................... 8

B. वाहत्या पाण्याच ेभूरुपशास्त्र ........................................................................................................ 8

C. उपोष्ि कटिबंधीय प्रदेशाच ेभूरुपशास्त्र ......................................................................................... 9

D. उपयोश्जत भूरुपशास्त्र................................................................................................................ 9

4. भूरुपशास्त्राच ेमहत्व ..................................................................... 11

5. भूरूपशास्त्राचा सद्याचा कल ............................................................ 13

Page 4: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

भू रू प शा स्त्र

2

भूरूपशास्त्राची ओळख पृथ्वीच्या बदलत्या अववष्कारांच े अचूक, सुसंबधधत व संयुश्ततक विणन आणि ववशदीकरि करिारे भूगोल हे शास्त्र आहे.

गोल हे शास्त्र असून यामध्ये प्रादेशशक ववशभन्नतेचा व प्रदेशा प्रदेशातील परस्त्पर

संबंधाचा अभ्यास केला जातो .पथृ्वीच्या बदलत्या अववष्कारांच े अचूक,

सुसंबधधत व संयुश्ततक विणन आणि ववशदीकरि करिारे हे शास्त्र आहे.

भूपषृ्िाच्या व मानवाच्या घननष्ठ संबंधाचा अभ्यास भूगोलात केला जातो. पथृ्वीच ेविणन म्हिजे भूगोल, एवढा भूलागोचा संकुधचत अर्ण सद्याच्या आधनुनक काळात राटहलेला नाही. प्राकृनतक व

मानवी घिकातील सूक्ष्म आंतरसंबंधाचा अभ्यास भूगोलामध्ये

केला जात आहे. भूगोल या शास्त्राच्या प्रमुख दोन शाखा आहेत.

1. मानवी भूगोल 2. प्राकृनतक भूगोल. या दोन प्रमुख शाखाच्या 87 उपशाखा आंतरराष्रीय भूगोल पररषदेने मान्य केल्या आहेत.

ननसगण ननशमणत प्राकृनतक घिकाचा अभ्यास प्राकृनतक भूगोलामध्ये केला जात असून 1.

भूरुपशास्त्र 2. हवामानशास्त्र 3. खगोलशास्त्र 4. मदृाशास्त्र 5. सागरशास्त्र इ. उपशाखा आहेत. यामधील बी.ए. भाग 1 सेमीस्त्िर 1 मध्ये आपि भूरुपशास्त्र व सेमीस्त्िर 2

मध्ये हवामानशास्त्र यांचा अभ्यास करिार आहोत.

1. भूरुपशास्त्राच्या व्याख्या भूरुपशास्त्र म्हिजे ववववध भूरुपांचा अभ्यास करिारे शास्त्र होय. भूरुपशास्त्र यास इंग्रजीमध्ये geomorphology असे म्हितात. याच े मूळ ग्रीक भाषेतून हे नामाशभधान आलेले आहे (Geo=earth पथृ्वी, Mopho= forms रूप,े logos=

discource विणन). पथृ्वीच्या पषृ्िभागावर आपिाला जी ववववध भूरुपे टदसतात ती भूरुपे स्त्वतःच एकेक शशलालेख असतात. ननसगाणने आपल्या भाषेत, त्या

Chapter

1

भू I C O N K E Y

Valuable information

Test your knowledge

Keyboard exercise

Workbook review

Page 5: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

3

भूरुपांचा इनतहास जिू त्यांच्यावर शलटहलेला असतो. तो उत्क्रांतीचा इनतहास कळवयास ननसगाणची भाषा अवगत असायला हवी, म्हिजचे भूरुपे व त्यांच्यामागील प्रकक्रया यांचा परस्त्पर संबंध ध्यानात येतो (ईस्त्िर ब्रुक1969).

भूरुपशास्त्र हे भूरुपांच े गुिधमण, ननशमणती व त्याचं्या ववकासाचा अभ्यास करते. आपि प्रवासातनू वा सहलीमधनू ववववध सुंदर भूरुपे पाहतो. त्यामध्ये प्रदेशाप्रदेशानुसार ववववधता आढळते, तर काही भूरुपात समानता आढळते. महाबळेववर येर्ील भूमीस्त्वरुपे सांगली वा कोल्हापूर पेक्षा वेगळी आहेत तर कनाणिकातील गोकाकचा धबधबा आंबोलीहून वेगळा आहे. यातूनच आपि पथृ्वीवरील ज्या भूपषृ्िावर राहतो, तो कसा ननमाणि झाला आहे? हे जािण्याची श्जज्ञासा भूरुपशास्त्र ननमाणि करते. अशा या भूरुपशास्त्राच्या ववववध तज्ञांनी खालील व्याख्या केल्या आहेत.

1. Webster: “Geomorphology is a science that deals with the relief feature of the earth”

वेबस्त्िर शब्दकोश: ‘पथृ्वीवरील भूरुपाववषयी अभ्यास करिारे शास्त्र म्हिजे भूरुपशास्त्र होय.’

2. Oxford dictionary: “the study of the physical feature of the earth surface and their relation to its geological structure.”

ऑतसफर्ण शब्दकोश: ’भूगभीय रचनेच्या सहसंबंधातून भूरुपाााचा ववकास जाििारे शास्त्र म्हिजे भूरुपशास्त्र होय.’

3. र्ब्लू. जी. मूर यांच्या मते, ‘पथृ्चीची प्राकृनतक रचना ककंवा भूकवचाच ेस्त्वरुप व संरचना ववशद करिारे शास्त्र म्हिजे भूरुपशास्त्र होय.’

4. भूकवच संरचना व प्राकृनतक रचना यांचा संबंध ववशद करिारे शास्त्र म्हिज ेभूरुपशास्त्र होय.

5. ‘पथृ्वीवरील भूरुपे व त्यांच्यावर होिार् या भौनतक, रासायननक व जैववक प्रकक्रया या संबंधीच ेअध्ययन करिारे शास्त्र म्हिजे भूरुपशास्त्र होय.’

6. एफ. जे. म कंहाऊस यांच्या मत,े ’पथृ्वीवरील भूरुपाची उत्पत्ती व ववकास यांच ेशास्त्रीय वववेचन करिारे हे ववज्ञान आहे.’

7. सर र्र्ले स्त्िॅंप यांच्या मत,े ’भूरुपशास्त्र हे भूमीरुपाच े शास्त्र असून त्यात प्रामुख्याने भूपषृ्िाचा आकार, उत्पत्ती व उत्क्रांती याचा समावेश होतो.’

Page 6: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

4

8.एस. र्ब्लू वुलररज: ’भूरुपांचा तुलनात्मक अभ्यास व भूरुपे ननमाणि करिार् या कारकांचा वववलेषिात्मक अभ्यास म्हिजे भूरुपशास्त्र होय.’

9.वसेस्त्िर यांच्या मते, ’भूरुपशास्त्र हे भूउठाव वैशशष्ठयांच ेपरृ्ःकरिात्मक विणन आहे.’

10.स्त्राल्हर यांच्या मतानुसार ’भूरुपाची ननशमणती व पद्धतशीर ववकास या घिकास प्राधान्य देिारे व प्राकृनतक भूगोलाच ेप्रमुख अगं असलेले भूरुपशास्त्र हे ववज्ञान आहे. तसेच भूरुपाच्या उत्क्रांतीवर प्राकृनतक प्रकक्रयाबरोबरच रासायननक व जैववक आणि हवामानाचा प्रभाव पर्त असतो.’

एकोणिसाव्या शतकापयतं भूरुपशास्त्राचा अभ्यास भूगभणशास्त्रात Geology मध्ये केला जात असे म्हिून

11 र् नणबरी यांच्या मतानुसार ’भूरुपशास्त्र हे प्रार्शमक भूगभणशास्त्र आहे.’

12.स्त्पाकण यांच्या मते, ’केवळ भूरुपाच्या ववशषेतः क्षरि प्रकक्रयेमुळे ननमाणि झालेल्या भूरुपाच्या उत्क्रांतीचा अभ्यास म्हिजे भूरुपशास्त्र होय.’

या ववववध व्याख्यावरून भूरुपशास्त्र हे भूरुपे व त्यावर होिार् या भौनतक,

रासायननक व जैव प्रकक्रया या संबधीच े अध्ययन करिारे शास्त्र आहे. यात भूरुपाची उत्पत्ती, ववकास, इनतहास, विणन व वगीकरि यांचा अभ्यास केला जातो. यामधनू या शास्त्राच ेअभ्यासक्षेर समजून येते. भूरुपशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्राचीन काळापासून झालेली आहे.

2. भूरुपशास्त्राचे स्त्वरुप भूरुपशास्त्राच्या ववववध व्याख्यावरुन पथृ्वीवरील भूआकारांच ेवगीकरि, उत्पत्ती /

ननशमणती, त्यांच्यामध्ये होिारे बदल वा ववकास, प्रकक्रया ववशद करिारे व त्यांच्यामधील परस्त्पर संबंध, कायणकारिभाव जाििारे हे शास्त्र आहे. र्ोर्तयात, अभ्यास कसा केला गेला व जात आहे म्हिजे एखाद्या शास्त्राच ेस्त्वरुप होय.

A. विणनात्मक स्त्वरूप

प्राचीन काळामध्ये (ग्रीक, रोमन कालखरं्) प्रवास, यारा, धमणप्रसार, नववन प्रदेश शोधमोहीम, सफरी, साम्राज्यववस्त्तार, व्यापार इ. कारिामूळे प्रदेशाच े विणन केले गेले. जगातील वेगवेगळया भागांची, प्रदेशांची माटहती उपलब्ध झाली. पथृ्वीच्या

Page 7: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

5

विणनाच ेशास्त्र म्हिून भूगोलाचा उगम झाला. या कालावधीत भूगोलाच ेम्हिजेच भूरुपशास्त्राच ेस्त्वरूप ननररक्षिात्मक व विणनात्मक होते.

B. ववतरिात्मक स्त्वरूप

पंधराव्या शतकानंतर भूगोलाच े स्त्वरूप ववतरिात्मक झाले. पथृ्वीवरील हवामान, वनस्त्पती, जमीन, सागरभाग, पवणत, नद्या यांच्या ववतरिाचा अभ्यास प्राकृनतक भूगोलात केला जाऊ लागला. कापूस, तांदळू, उूस, चहा यासारखी वपके कोठे होतात? दाि जंगले कोठे आढळतात? हवामान व भूपषृ्िरचनेत कोिते फरक आहेत? कोिते प्रािी व पक्षी कोठे आढळतात? यांची माटहती भूगोलात झाली. त्यातून कोिती भुरुप े कोित्या वपकासाठी, वनस्त्पतीसाठी ककंवा एखाद्या उत्पादनासाठी प्रशसद्ध आहे हे समजू शकले. मध्ययूगीन कालखरं्ात हे ववतरिाच ेशास्त्र बनले. केवळ विणनात्मक असे भूरुपशास्त्राचे स्त्वरूप राहीले नाही. वेगवेगळया भूरुपांच्या ववतरिांमूळे त्यांचा तूलनात्मक अभ्यास होऊ लागला. भूरुपशास्त्राच ेस्त्वरूप ववतरिात्मक, तूलनात्मक, व कायणकारिात्मक झाले.

C. वैज्ञाननक स्त्वरूप

अठराव्या शतकापासून भूगोलाच्या अभ्यासाला वजै्ञाननक स्त्वरूप प्राप्त झाले.

जमणन भूगोलतज्ञ कालण ररिर याने पथृ्वीववषयाच े शास्त्र म्हिजे भूगोल असे म्हिले. भूपषृ्िावरील ननरननराळया घिनाचा कायणकारिभाव शोधण्यात आले.

भूरूपशास्त्रामध्ये ववववध भूरूपाचा ननशमणतीचा कालखरं् व ननशमणती प्रककया ही पूराव्याव्दारे स्त्पष्ि केली जात आहे. प्राकृनतक घिकांच े वारंवार ननररक्षि करून त्यामधील बदलाची माटहती प्राप्त होते व त्याव्दारे ववववध ननसगण ननयम,

शसद्धांत मांर्ले गेले.

D. शास्त्रीय पाया असिारी शाखा

भूरुपशास्त्र हे प्राकृनतक भूगोलाची मुलभूत, शास्त्रीय पाया असिारी व भूगोलकारांना अभ्यासण्यास श्जज्ञासा जागरुक करिारी उत्साही शाखा आहे. या ववकाशसत शाखेमध्ये भूपषृ्ठावर घर्िार् या कक्रया प्रकक्रयांचा अभ्यास केला जातो. खर्कांच े गुिधमण, उत्पत्ती, संरचना, स्त्तररचना, त्याच े प्रकार व ववतरि यांच अभ्यास या शास्त्रात केला जातो. खर्कावर वातावरि, बाह्यकारके, मानवी घिकांचा पररिाम होवून ववदारि घर्ते. यामधनू तयार होिारे अनंतम खर्काच ेरुप म्हिजेच मदृा होय. मदृांची प्रदेशानुसार ववववधता ही उपलब्ध जनक

Page 8: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

6

खर्कावरील प्रकक्रयानुसार का आहे? अशी खर्क उत्पत्तीपासून मदृा या अनंतम स्त्वरूपापयतं शास्त्रीय पायाभूत माटहती भूरुपशास्त्रात अभ्यासली जाते.

E. भूरुपशास्त्र एक स्त्वतंर ज्ञानशाखेचे स्त्वरूप

वास्त्तववक कोित्याही शाखेच े सीमांकन करिे कटठि असते. पथृ्वीचा अभ्यास करिारी कोितीही ज्ञानशाखा ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ननगर्ीत असतेच. तरी सुद्धा भूरुपशास्त्राच ेएक स्त्वतंर ज्ञानशाखा म्हिून भूगोलात अश्स्त्तत्व आहे. पथृ्वीच्या उत्पत्तीनंतर भूकवचाची ननशमणती झाली. या भूकवचावर सातत्याने बदल झाले.

आज भूपषृ्ठ ज्या अवस्त्रे्त आहे ती अवस्त्र्ा लाखो वषाणपासून होत असलेल्या पररवतणनाची ननष्पत्ती आहे. म्हिजेच भूपषृ्ठात होत असलेल्या झालेल्या पररवतणनाच े वैज्ञाननक दृष्ठीकोनातून वववलेषि करिे हे भूरुपशास्त्राच े ध्येय आहे.अशा अध्ययन पद्धतीच ेस्त्वरुप आहे

F. वैश्ववक व व्यापक स्त्वरूप

या शास्त्राच ेअध्ययन करण्यास पथृ्वीवरील भखूरं् ेव महासागर या दोन्हीचा सवाणगीन व व्यापक दृष्िीने ववचार करावा लागतो. पथृ्वीवरील भूखरं् ेव महासागर ही प्रर्मशे्रिीची आद्य भूरुपे आहेत. पवणत, पठारे, मैदाने ही द्ववतीय शे्रिीची आणि ववववध कारकांनी तयार केलेली ततृीय शे्रिीची भूरुपे यांचा या शास्त्रात अभ्यास केला जातो. अशी भूरुपे प्रयोगशाळेत नव्हे तर ननसगाणत म्हिजेच जागनतक प्रयेागशाळेत पर्ताळून अभ्यासली जातात. सागरी भूरूपशास्त्र गेल्या 50 वषाणपासून सागरतळ व त्यावरील भूरुपे यांचाही अभ्यास केला जात आहे.

कारि भूहालचालीची कारिशममांसा करण्यासाठी सागरतळ रचनेची माटहती असावी लागते. सागरजलाची हालचाल, महासागरी प्रवाह, महासागरी बेिे आणि सागरजलाची क्षारता ही सागरीय भूरूपांच्या दृष्िीने अभ्यासली जातात.

भूरुपशास्त्र हा पथृ्वीच्या स्त्वरुपाचा, तिच्या उत्क्ाांिीचा अभ्यास आहे. असा अभ्यास अनेक स्त्तरावर कमी अधधक प्रमािावर केला जातो. पथृ्वीवरील ववशाल भूरुपांचा सुक्ष्म स्त्तरावर अभ्यास करतात. भूमीखरं् े महासागर यांच े ववतरि व त्यांच्या जागनतक स्त्तरावरील समस्त्या यातही भूरुपशास्त्राला अशभरुची असते. वैश्ववक पातळीवरील समस्त्या उकल करण्यास उंच पवणतरांगा, खोल महासागर,

सखल मैदाने इ. चा एकात्म दृष्ठीने अभ्यास करतात. कारि ही भूरुपे पथृ्वीची एकाश्त्मक घिक आहेत. भूरुपे उत्क्रांत होत असताना घर्िार् या सवण घर्ामोर्ी,

Page 9: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

7

खर्काच ेसंघिन, संरचना, प्रकार व त्यांच्यावर कायण करिार् या कारकांचा प्रकार,

हवामान इ. घिकांवर अवलंबून असतात.

G. अनुभवजन्य व सांश्ख्यकी स्त्वरूप

एखाद्या प्रदेशाच्या अनाच्छादनाच्या अध्ययनावरुन जलप्रिालीचा ववकास अवस्त्रे्चे वववलेषि करता येते. नदीमध्ये असिार् या अवसादाच्या आकारावरून क्षरिचक्राच्या त्या काळातील हवामान , क्षरि ननक्षेपि कक्रयांच े स्त्वरुप यांच ेअनुमान काढता येते. म्हिजेच अनुभवजन्य व सांश्ख्यकी दृश्ष्ठकोनातून अभ्यासाने भूदृवयाच्या ऐतहाशसक काळातील ववकासाच ेवववलेषि करता येते.

H. पद्धतशीर स्त्वरूप

भूदृवयांच्या पररवतणन प्रकक्रयेच्या अभ्यासाला पद्धतशीर दृश्ष्िकोन म्हिले जाते.पवणत, पठारे व मैदाने यात होत असलेली पररवतणने ववशशष्ठ अवस्त्रे्तून होत असतात. ते तकण संगतीने ननगमन पद्धतीन े काढता येते. असे प्रयोग करिे शतय नसत.े

भूरुपशास्त्राच्या संशोधनाची वैशशष्ठये यांवरून पद्धतशीर अभ्यासाच ेस्त्वरूप लक्षात येते. 1ननरीक्षिाव्दारे भूरुपाच े अचकू विणन करिे 2 भूरुपे व त्यांच्याशी ननगर्ीत असलेल्या प्रकक्रयाच े विणन करिे. 3. भूरुपे उत्पत्तीच्या पररकल्पना मांर्िे 4 भूरुप ननशमणती प्रकक्रयाचा अशभक्षेरीय अभ्यास करिे. 5.

भूरुपाच्या अध्ययनातून भूरुप उत्पत्तीववषयी शसद्धांताचा ववकास करिे. 6.

भूरुपाववषयी मांर्लेल्या शसद्धांताची तपासिी करिे.

I. आतंरववद्याशाखीय स्त्वरुप

वरील वववेचनावरुन भूरुपशास्त्र हे प्राकृनतक भूगोलाच े महत्वाच े अगं आहे. या शास्त्रात मुख्यत्वे नैसधगणक प्रकक्रयांचा ववचार केला जात असल्याने भूकंपशास्त्र,

मदृाशास्त्र, हवामानशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्णववज्ञान इ ववषयांचा संबंध येतो. आंतरववद्याशाखीय स्त्वरुपातून घिक अभ्यासले जातात. खर्काच े ववदारि अभ्यासताना खर्काचे रासायननक गुिधमण व वातावरिातील कक्रयानुसार तयार होिारी अनंतम रुप अभ्यासण्यास ववववध शास्त्राचा आधार घ्यावा लागतो.

Page 10: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

8

3. भूरुपशास्त्राची व्याप्ती भूरुपशास्त्राच े स्त्वरूप आंतरववद्याशाणखय असल्याने ववववध ववज्ञानाचा पूरक अभ्यास भूरुपशास्त्राबरोबर करावा लागतो. भूपषृ्ठाची उत्क्रांती, ननशमणती प्रकक्रया व ववकास जािून घेत असताना पथृ्वीच ेअतंरग भूरुपशास्त्र अभ्यासते. अतंरगातील ववववध स्त्तररचनेची खननजशास्त्रीय व रासायननक आणि पदार्ण ववज्ञानदृष्िीने अभ्यास केला जातो. अशा अभ्यासामुळे भूरुपशास्त्राची व्याप्ती प्रंचर् मोठी होत ेव ववषयाच्या ववववध उपशाखा यावरून टदसून येते.

A. सागर ककनार् याच ेभूरुपशास्त्र Coastal geomorphology

B. नदी प्रवाहाच ेभूरुपशास्त्र Fluvial geomorphology

C. उपोष्ि कटिबंधीय प्रदेशाच ेभूरुपशास्त्र tropical geomorphology

D. उपयोश्जत भूरुपशास्त्र applied geomorphology

A. सागर ककनार् याचे भूरुपशास्त्र

या शाखेत सागरी लािांच्या क्षरि व संचयन कायाणमुळे तयार होिार् या ववववध भूरुपांचा अभ्यास केला जातो. उदा. पुळि, उमीधचन्हे, वाळूच्या िेकर्या, वाळूच ेदांर्,े

सागरी गुहा, भूखरं्मंच, लिकता कर्ा आणि सागरी स्त्तंभ. सागरजलाच्या हालचालींमुळे तयार होिार् या शततीच े सूक्ष्म अध्ययन तसेच उष्ि व शीत सागरी प्रवाहाच ेवगीकरिही केले जाते. सागरतळाची संरचना व भूआकार यामुळे सागरी क्षारता व हालचालीवर होिारा प्रभाव यांचा अभ्यास केला जातो. प्रवाळ ककिकामुळे बेिांची ननशमणती कशी होत?े यासारख्या प्रवनांची उकलही यात होत.े

नदीच्या खार्यांमध्ये भरती व ओहिी प्रभावक्षरे इ. घिकांचा अभ्यास सागर ककनार् याच ेभूरुपशास्त्रात केला जातो.

B. वाहत्या पाण्याचे भूरुपशास्त्र

वाहत्या पाण्याच ेअश्स्त्तत्व भूखरं्ावर सवणर असते. हे वाहते पािी नदी, नाले, ओढे व ओहळ यांच्या स्त्वरुपात वाहत असताना संचयन व क्षरि कायण करते. नदीच्या ननक्षेपि कायाणमुळे गाळाच ेखर्क तयार होतात. पथृ्वीवरील सवाणत जूना गाळाचा खर्क सुमारे 430 कोिी वषाणपूवीचा आहे. यावरुन असे समजते की नद्याचे कायण पथृ्वीवर ककत्येक कोिी वषाणपासून आजपयतं सातत्यपूिण चालू आहे. अशा वाहत्या पाण्यापासून धबधबा, रांजनखळगे, धावत्या, व्ही आकाराची दरी, घळई, ननदरी, नागमोर्ी वळिे, त्ररभूज प्रदेश तयार होतात. यांच्या अभ्यासात अचकूता

Page 11: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

9

येण्यासाठी नदी प्रवाहाचा प्रवेग, पाराची संरचना, गाळाच े वगीकरि, गाळ वहन क्षमता, जलननःस्त्सार यांच े सूक्ष्मपिे अध्ययन वाहत्या पाण्याच्या भूरुपशास्त्रात होते.

C. उपोष्ि कटिबंधीय प्रदेशाचे भूरुपशास्त्र

उपोष्ि कटिबंधातील प्रदेशात जगातील सवाणधधक लोकसंख्या राहते. वसाहती बनववने, शतेी करिे, उद्योगधदें स्त्र्ापन करिे यामुळे लोकसंख्येचााा खर् या अर्ाणने भूरुपांशी आंतरसंबंध येतो. म्हिूनच उपोष्ि कटिबंधातील भूरुपशास्त्र ही शाखा उदयास आली. उपोष्ि कटिबंधातील प्रदेशात ववववध बाह्यकारकांमुळे भूरुपात होिार् या बदलांचा अभ्यास या शाखेत होतो. भूरुपातील बदलाच्या कक्रयेवर हवामानाचा प्रभाव टदसून येतो. हे बदल ववदारि व बाह्कारकांच्या क्षरि व भरि या कक्रयेतून होतात. उदा. ववदारिाचे प्रकार व तीव्रता हे हवामानानुसार शभन्न आढळतात. उष्ि कटिबंधात रासायननक व कानयक ववदारि प्रभावी असत ेतर शीत कटिबंधात केवळ कानयक ववदारि प्रभावी असते. लॅिेराईि मदृांची ननशमणती ही केवळ याच प्रदेशात होते. तीची ननशमणती प्रकक्रया यांचा अभ्यास केला जातो. भूरुपांच ेशास्त्रीय वगीकरिही केले जाते.

D. उपयोश्जत भूरुपशास्त्र

भूरुपशास्त्रीय आपत्ती Geomorphic Hazards यासारख्या नैसधगणक आपत्तीच ेव्यवस्त्र्ापनात उपयोश्जत भूरुपशास्त्रात अभ्यास केला जातो. त्सुनामी, आवत,े

पूर, मदृाधपू, भूसख्खलन, दरर् कोसळिे, भूकंप, ज्वालामुखी, प्लेिमधील हालचाली, वांळविीकरि, वाळूच्या िेकर्याच े अनतक्रमि, टहमनद्याच े ववतळिे यासारख्या ववववध भूरुपशास्त्रीय आपत्तीच ेअध्ययन या शास्त्रात होते. 1भूरुपाचे, संपदाच ेव आपत्तीच ेनकाश ेतयार कर

2 भूरुपांवर इतर अववष्कारांचा होिार् या प्रभावाच ेनकाश ेकाढिे.

3. भूरुपातील बदलाचा दर प्रत्यक्ष ननररक्षिाव्दारे ठरवविे व त्याव्दारे क्रमबद्ध वा सुसरतीपिे नकाशांची ननशमणती करिे.

4.बदलाच्या कारिाची मांर्िी करिे.

5. व्यवस्त्र्ापनाच्या दृष्ठीने पयाणयाच ेपररक्षि करिे.

6. उपाय योजना ननशमणती करिे.

7. उपाय योजना नंतरच्या बदलाच ेननरीक्षि करिे.

Page 12: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

10

8. भववष्यात घर्तील अशा घिकाच ेपूवाणनुमान काढिे

यावरुन या भूरुपशास्त्राची व्याप्ती प्रचरं् मोठी आहे. उपयोजनानुसार सद्या याच ेमहत्व टदवसेन टदवस वाढत आहे. उपयोश्जत भूरुपशास्त्रज्ञांची भूशमका ववषयाची व्याप्ती दशणववते मानव या खर्काच ेउपयोग पाषाि/अवमयुगापासून करीत आहे. मानवाचा खर् या झाल्या आहेत. अर्ाणने संबंध शशलावरिाशी येतो. अश्ननजन्य, जलजन्य व रुपांतरीत खर्क या घनरुप शशलावरिात आढळतात. या खर्काच े गुिधमण व ननशमणती प्रकक्रया ननरननराळी आहे. खर्कावर भौनतक, रासायननक व जैववक घिकांचा पररिाम होऊन ववदारि होते. ववदरिाचे अनंतम फशलत हे मदृा आहे.

कक्रयानुसार ववदारिाच ेवगीकरि रासायननक ववदारि, कानयक ववदारि व जैववक ववदारि असे केले जाते. मदृा या सुक्ष्म घिकापासून खर्कासारख्या स्त्र्लू घिकापयतं भूरुपशास्त्राची व्याप्ती आहे. मदृा हा वनस्त्पती जीवनाचा आधार आहे.

पथृ्वीवरील म्हिजेच शशलावरिवर आढळिारे खरं् व महासागर यांच ेववतरि असमान झाले आहे. भूतकाळात हे ववतरि सद्यपररश्स्त्र्तीपेक्षा वेगळे असल्याच े पुरावे पुराभूरुपशास्त्र स्त्पष्ठ करते. वेगनरने खरं्वहन शसद्धांताने या अभ्यासास खर् या अर्ाणने सुरुवात झाली. खरं्ाच े भूतकाळातील स्त्र्ान (भूरुपाचा ववकास) स्त्पष्ठीकरिासाठी इतर शास्त्राचा म्हिजेच वनस्त्पतीशास्त्र, प्रािीशास्त्र,

हवामानशास्त्र व भूगभणशास्त्र यांच्या पुराि पुराव्यांचा आधार घेतलेला टदसतो. महासागर व खरं् कस े ननमाणि वा उत्क्रांत झाले याबद्दलचा अभ्यास भूमंच वववतणननकी शसद्धांतामध्ये भूरुपशास्त्र करते. बदल घर्वून आििार् या भूअतंगणत व बटहणगत या दोन शतती सातत्यान ेकायणरत असतात. वातावरिातील कक्रयामुळे बटहणगत कारके कायणरत होत असतात.

यांपासून तयार होिारी ततृीय शे्रिीची भूरुपे यांचा अभ्यास भूरुपशास्त्र केला जात आहे. भूअतंगणतशतती व बाह्यकारके एकाच वेळी पथृ्वीवर कायणरत असतात.

खालील ततत्यामध्ये भूरुपाच ेवगीकरि, लागिारा कालावधी आणि प्रािी वनस्त्पतीवर होिारा परीिाम, भूअतंगणत शतती व बाह्यकारके यांचे प्रभागक्षेर हे भूरुपशास्त्राच्या व्याप्तीचे घिक आहेत. वाहते पािी/ नदी, टहमनदी, वारा, सागरी लािा या भूपषृ्ठावरील बाह्यकारकापासून भूशमगत पािी या बाह्यकारकापयतं अभ्यासक्षेर मोठे आहे. बाह्कारके व भूअतंगणतशततीमुळे तयार होिारी सुक्ष्मभूरुपाच े क्षेर 0.25 चौ ककमी पेक्षा कमी असते व भूरुपाचा ववकासास लागिारा कालावधी 10 वषाणपेक्षा कमी असतो. उदा. नदीपासून खळगे,

Page 13: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

11

टहमनदीपासून लहान सकण इ. भूरुपाचा प्रािी व वनस्त्पतीच्या कक्रयावर पररिाम होतो. याच पद्धतीने लघूस्त्तरीय भूरुपे, मध्यम स्त्तरीय भूरूपे व बहृद अर्वा स्त्र्लू भूरुपे यांना लागिारा कालावधी वरील ततता स्त्पष्ठ करतो. 10 वषाणपेक्षा कमी कालावधीपासून 10000 पके्षा मोठ्या कालावधीत तयार होिारी भूरुपाचा अभ्यास करिे एवढी प्रचरं् मोठी व्याप्ती भूरुपशास्त्राची आहे.

Figure 1 भूरुपशास्त्राची व्याप्ती

भूगोलामध्ये शीलावरि हे प्रमूख व्याप्ती क्षेर जरी भूरुपशास्त्राच े असले तरी भूगोलाच्या सवण सास्त्कृनतक शाखाच्या अभ्यासामध्ये भूरुपशास्त्राच ेज्ञान अननवायण व आववयक असते. संरक्षिशास्त्र, ववववध वस्त्तूच े पेिंि, ऋतूमानी पररवतणने व त्याच ेसामाश्जक परीिाम, नदीजल वािप समस्त्या, नद्याजोर् प्रकल्प, लोकसंख्या ववतरि व स्त्र्लांतर, नागरीकरि, वाहतूक व वसाहतीची ननशमणती या सवाणच्या अभ्यासामध्ये भूरुपशास्त्राच ेअनन्यसाधारि स्त्र्ान आहे.

4. भूरुपशास्त्राचे महत्व भूरुपशास्त्र हे भूगोल ववषयाच े हदय आहे. भूगोलातील ववववध घिकांचे स्त्पष्ठीकरि भूरुपशास्त्राशशवाय अपूिण आहे. ववववध स्त्पष्ठीकरिाचा तो पाया आहे. यामुळेच भूरुपशास्त्राच ेमहत्व आहे.

Page 14: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

12

1. आपि ज्या भूदृवयावर राहतो त्या टठकािची भूपषृ्ठरचना भूरुपशास्त्रामुळे समजून

घेता येत.े या रचनेची माटहती ववववध व्यवस्त्र्ापनामध्ये पायाभूत असते. खालील नकावयामध्ये सांगली श्जल्ह्याची भूपषृ्ठरचना समजते. अववच्छेदीत भूभागात गाळाच ेप्रमाि जास्त्त आहे व अनतववच्छेदीत भूभागात गाळाच ेप्रमाि कमी आहे कारि मदृा धपू तेरे् जास्त्त असते. याखेरीज शलनंनयमेंि भूजल साठे असिारी टठकािे दशणववतात.

Figure 2 सांगली श्जल्ह्याची भूपषृ्ठरचना

2. संरक्षिः आपल्या भारत देशाच्या भूपषृ्ठरचना जािून त्यानुसार सैन्यदलाची ननवर् केली जाते. सैननकांच्या छाविी क्षेर, युद्धरचना व युद्धपद्धती ही ठरववता येते. 3. आंतरराष्रीय संबंधः देशाच्या भूरचनेनुसार आंतरराष्रीय संबंधाची ननशमणती होते. टहमालयासारख्या सीमावती भागामुळे चीनसारख्या समाजवादी राष्राशी भारतास सलोख्याच ेसंबंध ठेवावे लागत आहे.

Page 15: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

13

4. आखाती देश खननजतेलाची पुरवठा जगास करतात यानुसार जागनतक टहतसंबंध जोपासना होते. खननज ननशमणती क्षेर, सभाव्य साठे याबाबतची माटहती भूरुपशास्त्र देते. 5. पािलोि ववकासः नदी भूरुपशास्त्रामध्ये नदीच्या पािलोिक्षेराचा अभ्यास केला जातो. या पािलोि क्षेराचा उतार, पाण्याच्या सभाव्य कृरीम साठयाची टठकािे, मदृा व पािी मुरण्याचा दर, भूशमगत पािी, भूजल पातळी, खर्क स्त्तररचना या भूरुपशास्त्रातील घिकांच्या अभ्यासाशशवाय पािलोि ववकास करिे शतय नाही. नदी पािी वािपाच ेप्रवन देखील अभ्यासतात.

6. नद्याजोर् प्रकल्प व जलशसचंन प्रकल्पाची पूतणता भूपषृ्ठरचनेचा अभ्यासानेच शतय आहे.

7. शहर ननयोजनः भूपषृ्ठरचना व उताराच्या अभ्यासाशशवाय शहरांची वाहतूक सुववधा, पािीपुरवठा, वसाहती क्षेर ठरु शकत नाही. उदा. 2005 साली आलेल्या पुरामुळे सांगली शहराच े नदीकर्ील वसाहतीक्षेर उंचवठयाच्या टठकािी हलववले आहे. सायपन / पाण्याच्या गुरुत्वाकषणि अर्वा उतारानुसार शहरातील पाईपलाईन िाकली जाते. रेल्वेलाईनसाठी ववषम उताराच्या टठकािी भराव िाकतात.

8. आपत्ती व्यवस्त्र्ापनः त्सुनामी, आवत,े पूर, मदृाधपू, भूसख्खलन, दरर् कोसळिे,

भूकंप, ज्वालामुखी, प्लेिमधील हालचाली, वांळविीकरि, वाळूच्या िेकर्याच ेअनतक्रमि, टहमनद्याच ेववतळिे यासारख्या आपत्तीच ेव्यवस्त्र्ापन करण्यासाठी, ननशमणती कारिे जािण्यासाठी व उपाययोजना राबववण्यास भूरुपशास्त्र हे सहायभूत ठरते. 9. पयणिन ववकासः पयणिनास आलेल्या पयणिकाच ेजीवन मौल्यवान आहे. यासाठी सुरक्षक्षत पयणिनक्षेराचा ववकास करण्यासाठी भूरुपशास्त्राची मदत होते. उदा. गिपतीपुळे येर्ील पुळिाचा उतार तीव्र आहे अशा टठकािे गार्ण व धोतयाच्या सूचनेच े फलक लावले आहेत. 2013 साली चार धाम करिारे प्रवासी गंगेच्या क्षेरातील आपत्तीमुळे प्रािास मुकले आहे.

5. भूरूपशास्त्राचा सद्याचा कल ग्रीक व रोमनाच े वास्त्तव्य हे सागर ककनारपट्टीच्या पवणतीय प्रदेशात होत.े

सागरसाश्न्नध्यामुळे सागराववषयी व नद्यांचे ननरीक्षि या तज्ञांच ेअधधक होते. त्यामुळे पथृ्वीच्या भूपषृ्िावरील ववववध भूरुपे व पवणतांची कशी झाली असावी याबाबत ग्रीक व रोमन तत्ववेत्ते यांना आवचयण वाित असे. अॅररस्त्ि िल, स्त्रेबो,

Page 16: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

14

हेरोर् िस, सेनेका या तज्ञांनी दर् याची व त्ररभूज प्रदेशाची ननशमणती कशी झाली असावी ? पवणताच्या माथ्यावर शंख व शशपंले का सापर्तात? याबाबत वववेचन केले होते.

कोलोफ न येर्ील सेनोफॅनसच्या मते (इस.पूवण 580 ते 480) पथृ्वीच्या भूपषृ्िाच े खचिे अर्वा उंचावण्यामुळे पवणताच्या माथ्यावर शंख व शशपंले सापर्तात. हेरोर् िसच्या मते (इस.पूवण 484 ते 420) इश्जप्तचा कमी उंचीचा भाग पूवी उपसागराचा होता व इश्जप्तचची ननशमणती ही नाईलची देिगी असून नाईलने वषाणनुवषे वाहून आिलेल्या गाळापासून त्ररभूज प्रदेश तयार झाला आहे हे स्त्पष्ि केले होते. अॅररस्त्ि िलच्या मते (इस.पूवण 384 ते 322) समुद्र व भूमी यांची जागा बदलते. ज्या टठकािी सध्या जमीन आहे त्या टठकािी पवुी समुद्र होते व ज्या टठकािी पुवी समुद्र होते तेरे् आत्ता जमीन आहे. स्त्रॅबोच्या मते ( इस .पूवण 64 ते इस 23

ज्या नदीच े पािलोि क्षेर मोठे व कमकुवत खर्काच े असते त्या नद्यामुळे मोठ्या क्षेरफळाच ेत्ररभूज प्रदेश तयार होतात. सेनेकाच्या मते (इस. 4 ते 65) ज्या नदींची खनन शतती जास्त्त असते अशा नद्याच्या दर् या खोल असतात. हेच मत नंतरच्या कालावधीत जेम्स हट्टन, ज न प्लेफेअर व चाल्सण लील यांनी जलप्रवाहामुळे नद्याच्या दर् यांची ननशमणती होते हे मत मांर्ले होते. या कालखरं्ानंतर जवळ जवळ वषांनंतर अरब तज्ञ इब्न सीना (इस.980 त े1037) याने ग्रीकाच े ज्ञान अरब भाषेत भाषांतर केले. नद्याच्या अपक्षरिातील फरकांमुळे काही पवणतांची ननशमणती झाली आहे व मदृ ूखर्कांमध्ये वार् यामुळे नछदे्र बनतात हे अॅररस्त्ि िलच ेमत अरबाना माटहत झाले.

शलओ नार्ो दी व्हीन्सीच्या मते (इस.1442 ते 1519) समुद्र व जमीन यांच्या पातळीतील बदलामुळे पवणताच्या माथ्यावर माथ्यावर शंख व शशपंले यांच ेजीवावशषे सापर्तात. नद्यामुळे दर् यांची ननशमणती होते व अपक्षरीत द्रव्य / गाळ नद्या वाहून नतेात व दसुर् या टठकािी ननक्षेपीत करतात. अठराव्या शतकात जीव्हिी तोझंट्टी (इस.1712 ते 1784) यांच्या मते जलाशयाच ेबांध फुिल्यामुळे पुर येतात. खर्काच्या प्रकारानुसार अपक्षरिाच्या वेगात फरक पर्तो. सौसर (इस.1740 ते 1799) यांनी टहमनद्यामुळे अपक्षरि होत,े दर् यांची ननशमणती होते व भूरुपे तयार होतात हे स्त्पष्ि केले होते. ग्रोह कालण धगलबिण हे ऐकोणिसाव्या शतकातील एक प्रमुख भूरुपशास्त्रज्ञ होत.े

त्यांनी भूरुपाच े सवेक्षि केले त्यामुळे भूरुपशास्त्राच्या ववकासास मदत झाली.

Page 17: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

15

धगलबिण यांनी भूहालचाली व क्षरि-ननक्षेपि प्रकक्रया यांववषयी मुलभूत कायण केल्यामुळे त्यांच्या अभ्यासात सुसंगतपिा आला. वेगनरने खरं्वहन शसद्धांतामधनू वैश्ववक पातळीवर प्रर्म शे्रिीच्या भूरुपातील बदलाबाबत जगाच े लक्ष कें द्रीत केले. ववल्यम एम. र्वे्हीस यांनी क्षरिचक्रांची सैद्धांनतक मांर्िीस महत्व टदले.

वाल्िर पेंक व ककंग यांनीही भूरुपाच्या ववकासाबाबत सैद्धानतक मांर्िी केली. ह िनण व स्त्राल्हर या तज्ञानी भूरुपशास्त्रात सांश्ख्यकीय पद्धतीचा उपयोग केला. 1950 नंतरच्या कालावधीत प्रायोधगक पद्धती, पररिामात्मक पद्धतीचा वापर सुरु झाला. अशलकर्ील काळात इतर ग्रह व उपग्रहावरील प्राकृनतक पररश्स्त्र्तीही अभ्यास भववष्यातील संधीसाठी केला जात आहे. संगिकशास्त्राचा वापर सद्यश्स्त्र्तीत भूरुपाचा अचकू अभ्यासासाठी तज्ञ करीत आहेत. उपग्रह प्रनतमा व हवाई छायाधचर यांचा वापर टदवसेंटदवस वाढत आहे.यामुळे प्रशममाने तयार करिे सोपे झाले आहे व त्ररमीतीय म र्ले्समाफण त ववववासाहणता तपासली जात आहे.

Page 18: Introduction to Geomorphology - Willingdon Collegewillingdoncollege.in/pdf/Study/Geography/1.pdf · Introduction to Geomorphology 1Moodle . GEOGRAPHY Introduction to Geomorphology

16